स्टारविन्सतर्फे शुक्रवारपासून ‘क्षण' छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

19 Apr 2023 17:25:56
Photographic Exhibition in Raja Ravi Verma Art Gallery

पुणे
: स्टारविन्स ग्रुपतर्फे शुक्रवार, दि. २१ ते दि. २३ एप्रिल या कालावधीत ‘क्षण' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ६० छायाचित्रकारांची ग्रे स्केल, फोटो स्टोरी, शॅडोज्‌‍, हिस्टॉरिकल मोन्यूमेंटस्‌, पॅटर्न या विषयांवरील २०० छायाचित्रे या प्रदर्शनात झळकणार आहेत. प्रदर्शनाचे यंदाचे आठवे वर्ष आहे.

Photographic Exhibition in Raja Ravi Verma Art Gallery

प्रदर्शन घोले रोडवरील राजा रवी वर्मा कलादालनात भरविण्यात येणार असून शुक्रवार दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळात सर्वांसाठी खुले असणार आहे. लोकांच्या आयुष्यात आनंदी क्षण फुलविणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि संस्थांना ‘क्षण' पुरस्काराने सन्मानित केले जाते.

Photographic Exhibition in Raja Ravi Verma Art Gallery

उद्घाटन सोहळ्यादरम्यान पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, जलतरणपटू जलजा शिरोळे, आदित्य वैकुळ आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांचा ‘क्षण' पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती प्रणव तावरे, स्वरदा देवधर, राज लोखंडे आणि प्रमेय झोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आपली कला प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता यावी या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या आयोजनात एसपीएस या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. 


Powered By Sangraha 9.0