मुंबई : नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसदस्य एकत्र आले होते. मात्र कार्यक्रमात उष्माघातामुळे १३ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. ही घटना दुर्दैवीच आहे, मात्र राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे न पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.सामंत म्हणाले की, अशा घटनेचे राजकारण न करता उलट विरोधकांनी अशावेळी एकत्र यायला हवे. या कार्यक्रमासाठी मदतनीस ६०० होते, नर्स १५० होत्या, रुग्णवाहिका ७३ होत्या. अमराईमध्ये ४ हजार बेडचं हॉस्पिटल सज्ज होतं. इतर हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्यात आले होते. तसेच १ हजार ५० बसेस होत्या. जास्तीत जास्त सुविधा श्री सदस्यांना देण्यात आलेल्या होत्या, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसात अचानक वातावरण बदलले. त्यामुळे तापमान ३४ ते ३५ पर्यंत पोहोचले, या कार्यक्रमासाठी अनेक श्री सदस्य आदल्या दिवशीच आले. ज्या श्रद्धेने लोक आले होते, त्यांना थांबवणे कठीण होते, असेही सामंत म्हणाले.नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसदस्य एकत्र आले होते. मात्र उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच रुग्णालयात श्रीच्या सेवेकर्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
श्रीसदस्यांच्या जाण्याने माझे मन जड झाले आहे’, अमित शाह गहिवरले . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर ट्विट करून दु:ख व्यक्त केले आहे.अमित शहा ट्विट करून म्हणाले की, “काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो”.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारमार्फत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आहे.जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.स्वतः मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देत माहिती घेतली आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन संपूर्ण समन्वय ठेवून असून वरिष्ठ अधिकार्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत.