शिवानी वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत गप्प का?

15 Apr 2023 18:08:30
sanjay-raut on shivani vadettiwar

मुंबई
: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या सावरकरांविषयीच्या आक्षेपार्ह विधानावर राऊतांनी मौन बाळगले. काँग्रेसच्या नेत्यांकडून सावरकरांविषयी वारंवार टिप्पणी केली जाते. मात्र, शिवसेनेने (ठाकरे गट) यावर प्रतिक्रिया देणे टाळले. यावरून, सावरकरांविषयी शिवसेना दुटप्पी भूमिका घेते, हेच यातून स्पष्ट होते.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला होता. ज्यामुळे सावरकरप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सावरकरांविषयीचे आक्षेपार्ह ट्विटस हटवले होते. महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून राहुल गांधींनी तसे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. परंतु, काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांच्याकडून सावरकरांचा अवमान करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Powered By Sangraha 9.0