जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर पाईप बॉम्ब हल्ला

15 Apr 2023 19:57:11
japan-pm-kishida-attacked-with-pipe-bomb-amid-wakayama-speech

नवी दिल्ली
: जपानमधील वाकायामा शहरात जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भाषणादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पाईप सारखी वस्तू फेकली. या पाईपबॉम्बद्वारे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

तेव्हा पश्चिम जपानमधील वाकायामा शहरातील बंदरास भेट दिल्यानंतर फ्युमियो किशिदा हे एका सभेस संबोधित करत होते. त्यावेळी घटनास्थळी जोरदार स्फोटाचा आवाज झाला. यावेळी पाईपबॉम्बद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या घटनेमध्ये जपानचे पंतप्रधान हे सुखरूप आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते ट्विटद्वारे म्हणाले, जपानमधील वाकायामा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात हिंसक घटना उघडकीस आली, जेथे माझे मित्र पंतप्रधान फुमियो किशिदा उपस्थित होते. ते सुखरूप असल्याचा समजल्यावर दिलासा मिळाला. त्यांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना. भारत सर्व हिंसाचाराचा निषेध करतो.



Powered By Sangraha 9.0