नवी दिल्ली : फ्रान्समधील मॉन्ट डी मार्सन लष्करी तळावर सुमारे तीन आठवड्यांच्या बहुराष्ट्रीय हवाई सरावासाठी भारत चार राफेल जेट, दोन सी-17 विमाने आणि दोन आयएल - 78 विमाने पाठवणार आहे. भारतीय हवाई दलाची राफेल विमाने परदेशी हवाई सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, दलाची एक तुकडी फ्रान्सला पोहोचली असून फ्रान्समधील मॉन्ट डी मार्सन येथील एअर फोर्स बेस स्टेशनवर आयोजित ओरियन सरावात भारतीय हवाई दल सहभागी होणार आहेहा सराव कार्यक्रम 17 एप्रिल ते 5 मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या सरावासाठी भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये चार राफेल विमाने, दोन सी-17 विमाने आणि दोन आयएल - 78 विमाने आणि 165 हवाईदल जवानांचा समावेश आहे.
भारत आणि फ्रान्सशिवाय जर्मनी, ग्रीस, इटली, नेदरलँड, यूके, स्पेन आणि अमेरिका या देशांचे हवाई दलही या सरावात सहभागी होणार आहेत.