मुंबई : वरळी येथील नेहरू तारांगण जवळील बस स्थानके अद्ययावत सोयी सुविधांनी परिपूर्ण करण्यात आली आहेत. येथे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी आरामदायी आसने तसेच वाचनालयाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींपासून जेष्ठ नागरिक व लहान मुलांसाठीही विविध सोयीचे आयोजन केले आहे.
दिव्यांगांसाठी विशिष्ट मार्गिकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जेष्ठांना आणि महिला प्रवाशांना बसण्यासाठी विशेष सुविधा आहेत. मोकळ्या वेळात वाचनासाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र पाठवण्यासाठी टपाल पेटीची व्यवस्थाही आहे. त्याबरोबरच या ठिकाणी गैरवर्तवणूक होऊ नये म्हणून सिसिटीव्ही कॅमेरा आणि पर्यवेक्षणासाठी शिपायाची नेमणूक करण्यात आलेली आहे.