असा होता उत्तरा बावकर यांचा प्रवास..

13 Apr 2023 12:30:43
 
uttara bavkar
 
उत्तरा बावकर यांचे निधन झाले असे समजले आणि संपूर्ण मराठी आणि हिंदी कलासृष्टी गहिवरली. उत्तरा या एकेकाळच्या एनएसडी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रमा)च्या गाजलेल्या विद्यार्थिनी. आणि त्यानंतर प्रशिक्षिका सुद्धा. इब्राहिम अल्काझी यांच्या शिष्या आणि त्यानंतरचा त्यांचा रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील प्रवास थक्क करणारा होता. 'तमस' या मालिकेपासून त्यांना कलासृष्टीने ओळख मिळवून दिली. त्यानंतर दूरदर्शन, मालिका, मराठी व हिंदी नाटके आणि अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयच ठसा उमटवला. वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. अल्काझींच्या तालमीत तयार झाल्याने हिंदी रंगभूमीवरचा सुवर्णकाळ त्यांनी अनुभवला आणि स्वतःचे योगदान दिले. ‘अंधायुग’मधील गांधारी ही त्यांची भूमिका विलक्षण गाजली. प्रायोगिक रंगभूमीसाठीसुद्धा त्यांनी खूप कार्य केले.
 
अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शनही केले. जयवंत दळवींची अत्यंत गाजलेली नाटिका संध्या छाया च्या संहितेचे कुसुम कुमार यांनी हिंदी भाषांतर केले होते. या हिंदी नाटकाचे दिग्दर्शन त्यानं केले होते. उत्तरा बावकर यांनी १९८६ मध्ये ‘यात्रा’ या मालिकेतून मनोरंजनविश्वात पदार्पण केले होते. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या.
 
उत्तरा यांना १९८४चा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हिंदी नाट्य अभिनयासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याचबरोबर ४ वर्षांनी १९८८ साली 'एक दिन अचानक' चित्रपटातील अभिनयासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता.
Powered By Sangraha 9.0