नवी दिल्ली : कोप-इंडिया-23 चा दुसरा टप्पा एअरफोर्स स्टेशन कलाईकुंडा येथे सुरू झाला आहे. यामध्ये, भारतीय हवाई दल आणि अमेरिकन हवाईदलाच्या सुपर हरक्यूलस विमानांनी पूर्व सेक्टरमधील ड्रॉपिंग झोनमध्ये एअरड्रॉप मिशनसाठी उड्डाण केले. सरावाच्या या टप्प्यात अमेरिकी वायुसेनेचे एफ-१५ लढाऊ विमानही सहभागी होणार आहे. हा द्विपक्षीय हवाई सराव अर्जन सिंग (पानगढ), कलाईकुंडा आणि आग्रा या हवाई दलाच्या स्टेशनवर आयोजित केला जात आहे.
हवाई सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई-30 एमकेआय, राफेल, तेजस आणि जग्वार यांचा समावेश असेल. या सरावात हवाई रिफ्युलर, एअरबोर्न वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टीम आणि एअरबोर्न अरली वॉर्निंग आणि भारतीय हवाई दलाच्या नियंत्रण विमानांचा समावेश असेल. हा सराव दोन्ही हवाई दलांमधील व्यावसायिक संबंध वाढविण्यात आणि त्यांच्यातील सर्वोत्तम सराव सामायिक करण्यात मदत करेल. या सरावात जपानी हवाई दलदेखील निरिक्षक म्हणून झाला आहे.
या द्विपक्षीय लष्करी प्रशिक्षण सरावाचा उद्देश सकारात्मक लष्करी संबंध वाढवणे आणि एकमेकांच्या सर्वोत्तम लष्करी पद्धतींचा अवलंब करणे हा आहे. हे दोन्ही लष्करांना युएनच्या आदेशानुसार रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धतीच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल. याशिवाय, या संयुक्त सरावामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी मजबूत होईल, जो संपूर्ण भारत-अमेरिका सामरिक भागीदारीचा एक महत्त्वाचा पैलू आहे.