अतीक अहमदच्या मुलाचा एन्काऊंटर ; ओवैसी-अखिलेशच्या डोळ्यात पाणी!

13 Apr 2023 17:54:26
samajwadi-party-akhilesh-yadav-declares-asad-ahmed-encounter-fake-owaisi


नवी दिल्ली
: माफिया अतीक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार मोहम्मद गुलाम यांच्या एन्काऊंटरवरून राजकारण सुरू झाले आहे. १३ एप्रिल रोजी यूपी एसटीएफने त्या दोघाचा ही एन्काऊंटर केला. मात्र सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या एन्काऊंटरला फेक असल्याचे म्हणटले आहे. तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मावरून एन्काऊंटर केले जात असल्याचे म्हणटले आहे.

 


अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे की, राज्य सरकार खोटे एन्काऊंटर करून खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सरकारचा न्यायालयावर अजिबात विश्वास नाही.असद अहमदच्या एन्काऊंटरची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना सोडता कामा नये. त्याचबरोबर काय योग्य,काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही, असे ही अखिलेश यादव म्हणाले आहेत.



हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही असद आणि गुलामच्या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले आहे. सरकारने गोळ्या घालून न्याय करायचे ठरवले असेल तर न्यायालये बंद झाली पाहिजेत. या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे, असे ही ओवैसी म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0