कोकणात चाकरमान्यांना जाण्यासाठी जादा गाड्या

    10-Apr-2023
Total Views |
konkan-railway-has-decided-to-run-more-express

मुंबई
: मे आणि एप्रिल महिन्यात कोकण रेल्वे मार्गावर गाडयांना होणाऱ्या गर्दीवर उपाय म्हणून नियमित कोकण मार्गावर चालणाऱ्या गाड्यांबरोबर आणखी काही विशेष गाड्या धावणार आहेत. यापूर्वीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये आता आणखी दोन गाड्यांची भर पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी

- लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी - १५ एप्रिल ते ३ जून २०२३ - दर शनिवारी सोडण्यात येणार - रात्री ०१.१० मिनिटांनी सुटून    त्याच दिवशी दुपारी ०२.३५ वाजता पोहोचेल

- परतीचा प्रवास - त्याच दिवशी सायंकाळी ०४.२० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता लोकमान्य टिळक  टर्मिनसला पोहोचेल

- ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड,             कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल

पुणे ते एर्नाकुलम

- पुणे ते एर्नाकुलम दरम्यान सुपरफास्ट धावेल - १३ एप्रिल ते २५ मे २०२३ - आठवड्यातून एकदा धावेल - दर गुरुवारी सायंकाळी       ०६.४५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.५० मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल

- परतीचा प्रवास - शुक्रवारी रात्री ११.२५ मिनिटांनी सुटेल

- लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव स्टेशनवर थांबेल




 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.