अकोला : पारस येथे झाड पडून ७ जणांचा मृत्यू झाला, तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली. दि.९ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी मदिंरात ५० ते ६० भाविक होते. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावासामुले ही दुर्घटना घडली. तरीही पावसात मदतकार्यात अडथळे येत असताना ही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मदतकार्य सुरू होतं.
आता महाराष्ट्र सरकारने पारस येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना मोफत वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली आहे. तसेच या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.तरी सद्या सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल. एकूणच संपूर्ण घटनेची चौकशीचे आदेश मी दिले आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.