मुंबई : संत शिरोमणी रोहिदास यांचे जीवन विचार आणि कार्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विचार व्यक्त करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार, दि. २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे प्रकाशन करण्यात येणार आहे.
राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या वेळी वसुधा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक धनंजय वसंत वायंगणकर, प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील तर उच्च तंत्रशिक्षण, विभागाचे संचालक शैलेन्द्र देवळणकर आणि आयआयटी मुंबईचे मुख्य व्यवस्थापक डॉ. नयन दाभोळकर तसेच रोहिदास समाज पंचायत संघाचे विश्वस्त रवि पेवेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत रविंद्र नाट्य मंदिरात, पु.ल. देशपांडे अकॅडमी, मिनी थिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे.