होय! मी सावरकर... संपूर्ण राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार!

01 Apr 2023 17:11:50
 
Savarkar Gaurav yatra
 
 
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. राज्यभर 'सावरकर गौरव यात्रा' सुरु करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. वारंवार सावरकरांचा होणारा अपमान लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेता येईल, यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवार २ एप्रिल, संध्याकाळी ५ वाजता सीझर रोड, आंबोली जंक्शन ते अंधेरी स्टेशन येथे यात्रा सुरू होईल.
 
 
छत्रपती संभाजीनगरमध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्यावर सरकार ठाम आहे. सावरकर गौरव यात्रेचा कार्यक्रम अगोदरच ठरला होता. त्यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली. पोलिसांच्या परवानगीनेच सभा होत असल्याची माहिती कराड यांनी दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0