मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला रंगीत चित्रपट म्हणजे पिंजरा. या चित्रपटातूनच प्रसिद्ध नट डॉ. श्रीराम लागू यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. आज ३१ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९७२ साली याच दिवशी हा प्रथम प्रकाशित झाला होता. व्ही शांताराम यानिया चित्रपटांचेदिग्दर्शन केले होते तारलागू यांच्यासोबत अभिनेता निळू फुले हे देखील प्रमुख भूमिकेत होते. मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाची कथा सामाजिक मूल्य जपणाऱ्या एका शिक्षकाची आहे. या चित्रपटात एक मराठी शिक्षक एका तमाशा महिला कलाकाराला सुधारण्याचा प्रयत्न करतो, असे दाखवले आहे. 'पिंजरा' ही एका तत्त्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अधःपतनाची कथा आहे.
१९७२ साचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कर या चित्रपटाला प्राप्त झाला होता. अडीच तासाच्या या चित्रपटात अनंत माने यांची कथा आहे तर व्ही शांताराम यांनीच पटकथा लिहिली आहे. शंकर पाटील यांनी संवाद लेखन केले आहे. तर, राम कदम यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. शशी साटम यांनी रंगभूषा केली आहे. श्रीराम लागू मास्तरांची भूमिका करत आहेत, निळू फुले तमाशाचे ओनर आहेत तर अभिनेत्री संध्या तमाशाला स्त्री म्हणून दाखवली आहे. वत्सला देशमुख यांनीही आत भूमिका साकारली आहे.
जगदीश खेबूडकरांनी लिहिलेलंही गीते अजरामर झाली आहेत. उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या द्वयीने गायलेली गीते आजही सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतात.
या चित्रपटात खालील गाणी आहेत-
आली ठुमकत नार लचकत नार... ग साजणी
कशी नशिबानं थट्टाआज मांडली ..
छबीदार छबीमी तो-यात उभी ..
तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..
दिसला ग बाई दिसला..
दे रे कान्हा चोळीलुगडी..
मला इष्काची इंगळी डसली..
मला लागली कुणाची उचकी..