कोकणात आढळला नवीन किल्ला!

28 Mar 2023 14:19:54
 
Ramgarh Fort
 
 
मुंबई : कोकणात म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि खेड तालुक्याच्या सीमेवरतीच रामगड नावाचा किल्ला आढळून आल्याचा दावा दुर्ग अभ्यासक संदीप परांजपे आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉक्टर सचिन जोशी यांनी केला आहे.
 
खेड तालुक्यात असलेल्या पालगडपासून जवळच्या एका डोंगरावर हा नवा रामगड किल्ला आढळून आला आहे. अभ्यासकांनी इतिहासातील संदर्भ आणि वास्तू रचनेतील शास्त्रीय पुराव्यावर आधारित असा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. याच ठिकाणी असलेल्या पालगडसाठी हा जोडकिल्ला असावा असा अंदाज देखील अभ्यासाकांनी वर्तवला आहे.
 
 
Ramgarh Fort
 
 
महाराष्ट्रात आता दोन रामगड असून पहिल देवगड तालुक्यात आहे, तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यात आढळला आहे. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याबाबात माहिती मिळालेली आहे. परंतु पालगड किल्ल्यासोबतच हा रामगड बांधला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
या रामगड किल्ल्याच्या सॅटेलाइट इमेज सुद्धा काढण्यात आल्या आहेत. काही बांधकामाचे अवशेष दिसले आहेत. सर्वेक्षणात किल्लाचा दरवाजा, दोन संरक्षक बुरूज, काही थडगी, भांड्यांचे तुकडे मिळाले आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजा पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अशी माहिती पुरातत्त्व अभ्यासकांनी दिली आहे.
 
 

Ramgarh Fort 
Powered By Sangraha 9.0