मुंबई, २७ मार्च २०२३ : सीएमएस इन्फो सिस्टीम्स लिमिटेड ही बँकिंग लॉजिस्टिक आणि तंत्रज्ञान सेवा प्रदान करणारी भारतातील आघाडीची व्यावसायिक सेवा कंपनी आहे. २०२१ मध्ये लॉन्च झाल्यापासून दहापटीने अधिक ‘एआयओटी रिमोट मॉनिटरिंग सर्व्हिस’ या नवीन व्यवसायाला गती देते. या नवीनतम रिमोट मॉनिटरिंग सेवेसह एआय आणि आयओटीद्वारे समर्थित कंपनी २०२३ च्या आर्थिक वर्षा अखेरीस १०० कोटी रुपयांच्या वार्षिक रन रेटचा टप्पा गाठण्याचे ध्येय ठेवते.
एक तंत्रज्ञान समाधान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये २ हजार लाइव्ह साइट्स (मॉनिटरिंग पॉइंट्स) असलेले ‘आरएमएस’ आज २० हजारहून अधिक साइट्सपर्यंत वाढले आहे. सीएमएसचे आरएमएस हे भविष्यातील तयार रिमोट मॉनिटरिंग सादर करते आणि डेटावर आधारित व्यवसायाला एक नवीन आयाम जोडते. जोखीम कमी करण्याव्यतिरिक्त, हे ऊर्जा व्यवस्थापन, कर्मचारी निरीक्षण आणि साइट अनुपालन देखरेख यासारख्या उपयुक्त व्यवसायांना अंतर्दृष्टी प्रदान करते. जागतिक सुरक्षा मानकांद्वारे प्रमाणित, ही नवीनतम रिमोट मॉनिटरिंग ऑफर आज बँका, बिगर बँक वित्तीय संस्था अर्थात एनबीएफसी, रुग्णालये आणि एफएमसीजी क्षेत्रांचा समावेश असलेल्या विविध उद्योगांना सेवा देते.
रिमोट मॉनिटरिंग सर्व्हिसेसची प्रमुख वैशिष्ट्ये:
- व्यवसाय अंतर्दृष्टी सक्षम करण्यासाठी ४० हून अधिक सखोल-शिक्षण एआय मॉड्यूल्सच्या ऑफर
- संपूर्ण भारतातील २० हजारहून अखिक थेट साइटवर तैनात केलेल्या १० लाख उपकरणांशी संलग्न
- सादर झाल्यापासून १ हजारहून अधिक धोके रोखले गेले आहेत आणि २५ टक्के ऊर्जा कार्यक्षमता निर्माण झाली आहे
- केंद्रिकृत नियंत्रण केंद्रात लाइव्ह मॉनिटरिंगसह दररोज ६० हजारहून अधिक सूचनांवर प्रक्रिया
या व्यवसायावर भाष्य करताना, श्री. मंजुनाथ राव, अध्यक्ष – व्यवस्थापन सेवा, सीएमएस इन्फो सिस्टीम्स म्हणाले की, ‘एक अत्याधुनिक तंत्रज्ञान समाधान म्हणून रिमोट मॉनिटरिंगमध्ये प्रचंड क्षमता दिसून आली आहे. व्यवसायांना सामोरे जाणाऱ्या समस्यांचे रिअल-टाइम आधारावर निराकरण करणे आणि त्यांच्यासाठी कार्यक्षमता तसेच उत्पादकता वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला खात्री आहे की, आमच्या ग्राहकांना त्यांच्या जटिल आणि वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सानुकूलित केलेल्या ऑफर्सचा फायदा होईल.’
एआयजीएस (कृत्रिम बुद्धिमत्ता ग्लोबल सर्व्हिलन्स) निर्देशांकानुसार, जागतिक स्तरावर १७६ पैकी किमान ७५ देश एआय-आधारित पाळत ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत. सीएमएसचे आरएमएस हे लोकसंख्याशास्त्र, ग्राहक वर्तन आणि साइट समस्यांचे कार्यक्षमतेने निराकरण करण्यासाठी दूरस्थ निदानची (रिमोट डायग्नोस्टिक्स) सज्जता यासारख्या व्यवसायाच्या अंतर्दृष्टीसाठी आवश्यक असलेल्या समृद्ध ऑफरसह सुसज्ज आहे.