मविआत फूट? काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंवर नाराज!

27 Mar 2023 13:38:53

Uddhav Thackeray



मुंबई
: मालेगाव सभेत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधींना खडेबोल सुनावले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एकही अवमानकारक शब्द ऐकून घेणार नाही, आपण लोकशाहीसाठी एकत्र आलो आहोत, अशी आठवण त्यांनी राहुल गांधींना करून दिली. मात्र, ही गोष्ट आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेत्यांना खटकली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा मुद्दा महाविकास आघाडीसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आपण त्यांनाही इशारा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुन नाना पटोलेंसह अन्य काँग्रेस नेतेही दुखवावल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी तसे वक्तव्य करायला नको होते, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये दबक्या आवाजच चर्चा आहे. याबद्दल सोमवार, दि. २७ मार्च रोजी नाना पटोलेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करण्याचे टाळले. मविआमध्ये सावरकर हा कळीचा मुद्दा बनू शकतो, असा इशारा त्यानी उद्धव ठाकरेंना दिला आहे.



Powered By Sangraha 9.0