तिरुपती देवस्थानाला मिळाल्या १० इलेक्ट्रिक बस

27 Mar 2023 14:35:05
 
MEIL ग्रुपच्या ऑलेक्ट्रा कंपनीकडून बसेस मंदिर समितीकडे  सुपुर्द


मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरण पुरक वाहतुकीची सोय

तिरुपती :  तिरुपतीला दक्षिणा देण्याच्या प्रथेच्या अनेक कहाण्या तुम्ही वाचल्या असतील. पण आता तिरूपतीच्या देवाला चक्क इलेक्ट्रिक बसेस भेट म्हणून मिळाल्या आहेत.  मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड अर्थात एमईआयएल या कंपनीची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमीटेड ने  तिरुमाला तिरुपती देवस्थानाला (TTD) ला 10 इलेक्ट्रिक बसेस भेट स्वरुपात दिल्या आहेत.  

तिरुमला घाट हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे.  डिझेल इंधन न वापरता  इलेक्ट्रिक बसेसचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन घट होण्यास तसेच इंधनाच्या खर्चात कपात होण्यास मदत होईल. TTD ट्रस्टने या देणगी बद्दल MEIL चे आभार मानले.


ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. प्रदीप याप्रसंगी तिरुमला येथे उपस्थित होते. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक 9-मीटर- प्रकारातल्या या 10 ई-बस डोंगराच्या वरच्या भागातल्या मंदिर परिसरात भाविकांची वाहतूक करतील. या ई-बससाठी चार्जर स्टेशन्स उभारले असल्याचे त्यांनी सांगीतले.

WhatsApp Image 2023-03-27 at 14.20.43.jpg
Powered By Sangraha 9.0