उद्धव ठाकरे राहुल गांधींना जोडे मारणार काय़?

27 Mar 2023 16:33:15
 

shinde
 
 
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावद्दल पुन्हा अवमानकारक वक्तव्य केले. यामुळे राज्यातचे संपूर्ण वातावरण तापले असताना आता यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राहुल गांधींचा निषेध करावा तेवढा कमी आहे. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला.
 
मुख्यमंत्री म्हणाले, "मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. सावरकरांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाल आहे. सावरकराचा वारंवार अपमान राहुल गांधी करत आहेत. ते परदेशात जाउन आपल्या देशाची निंदा करत आहेत. त्यांना विचारलं पाहिजे, अपमान सहन करणार नाही, म्हणजे काय करणार? उध्दव ठाकरेंची भुमिका दुटप्पी आहे. नुसतं बोलुन काय होणार, कृतीतुन दाखवा. तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का?" असं आव्हान शिंदेंनी उध्दव ठाकरेंना दिल.
 
"बाळासाहेबांनी हिंमत दाखवली तशी हिंमत तुम्ही दाखवणार का? उध्दव ठाकरेंना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. राज्यात लवकरच 'सावरकर गौरव यात्रा' सुरु करणार. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल आता सगळा देश रस्त्यावर उतरला आहे. विधानसभेच्या प्रांगणातही आमच्या आमदारांनी याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. राहुल गांधी यांच्याबाबत असलेली ती चिड आहे." असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0