तळोजा हिल फॉरेस्टची सर्व माहिती छोट्याशा फिल्ड गाईडमध्ये

25 Mar 2023 12:53:47


taloja field guide



मुंबई (प्रतिनिधी): आयनेचर फाऊंडेशन तर्फे तळोजा हिल फॉरेस्टचे छोटेखानी फिल्ड गाईडचे अनावरण शुक्रवारी संध्याकाळी बिएनएचएसमध्ये केले गेले. या कार्यक्रमासाठी संचुरी नेचर फाऊंडेशनचे बिट्टू सहगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


या छोटेखानी फिल्ड गाईडमध्ये १९३ वनस्पतींच्या प्रजाती, ८४ कीटकांच्या, ६ उभयचर, १६ रेपटाईल्स, ७७ पक्षी आणि १० सस्तन प्राण्यांच्या प्रजातींची नोंद तळोजा हिल फॉरेस्टच्या भागात करण्यात आली आहे. आय नेचर फाऊंडेशनच्या डॉ. व्ही. शुभलक्ष्मी, बटरफ्लाय मॅन ऑफ इंडिया आयझॅक केहीमकर, प्रीती चोगले आणि आयनेचर फाऊंडेशनच्या इतर सदस्य यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे फिल्ड गाईड आकारास आले आहे.

 
"तीन वर्षे तळोज्यामध्ये सुरू असलेला आमचा संवर्धनसाठीचा प्रकल्प आता पूर्ण होतोय. त्या निमित्ताने संवर्धन आणि इकोरिस्टोरेशन साठी एक वारसा मागे ठेऊन जाण्यासाठी आम्ही हे फील्ड गाईड बनवले आहे. यात तळोज्यामध्ये आढळणाऱ्या सर्व वनस्पती, प्राणी, फुलं, पक्षी, कीटक यांचा समावेश असल्यामुळे तळोज्याला जाणाऱ्या सगळ्यांसाठीच ते खूप उपयोगी ठरणार आहे", असे मत आयनेचर फाऊंडेशनच्या डॉ. शुभलक्ष्मी यांनी व्यक्त केले आहे. 





taloja field guide
Powered By Sangraha 9.0