नाशिक : “शहरातील आनंदवली परिसरात प्रसिद्ध नवश्या गणपती शेजारी अनधिकृत दर्गा आहे. ती दर्गा तत्काळ हटवावी. प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास आम्हालाही कारसेवकांचा इतिहास आहे” असा थेट इशारा ‘सुदर्शन राष्ट्र निर्माण ट्रस्ट‘चे सुरेश चव्हाणके यांनी दिला.
गुरुवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांसह चव्हाणके नवश्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेव्हा त्यांनी या हजरत सैय्यद हसन रांझेशाह बाबा रहेमतुल्लाह अलैह दर्ग्याची पाहणी केली. त्यानंतर हा दर्गाच पूर्ण अनधिकृत आहे. ते पाडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ही दर्गा न हटविल्यास आम्हाला कारसेवकांचा मोठा अनुभव पाठिशी असल्याचेही चव्हाणके यांनी सांगितले.
पूर्वी येथे फक्त पेशवेकालीन मंदिर होते. या परिसरात नंतर अतिक्रमण वाढत जाऊन एवढी मोठी दर्गा स्थापन झाली. ही दर्गा आज मंदिरापेक्षा मोठी झाली आहे. नाशिक महानगरपालिकेचे प्रशासनाला याबाबत रितसर निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करणार आहे. जर हा प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही आमच्या पद्धतीने दर्ग्याचा प्रश्न निकाली लाऊ असेही चव्हाणके म्हणाले. दरम्यान यावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकर्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त दर्ग्याबाहेर तैनात करण्यात आला होता.
तर नियमाप्रमाणे कारवाई
नवश्या गणपती शेजारी असलेल्या दर्ग्याची मनपाचे कर्मचारी जागेची पाहणी लवकरच करतील. अनाधिकृत बांधकाम असेल तर नियमाप्रमाणे ते हटवले जाईल.
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त.
‘ती’ जागा पेशव्यांची आहे. गणेश दर्शनाला येणार्या भक्तांसाठी येथे निवासाची सोय करण्यात आली होती. या अनधिकृत दर्ग्याबाबत मनपा प्रशासनाला निवेदन दिले जाईल. मनपाच्या पुढील धोरणावर आमचा निर्णय राहील.
- सुदर्शन चव्हाणके, अध्यक्ष, सुदर्शन राष्ट्र निर्माण ट्रस्टअध्यक्ष