अरुण शेखर यांना साहित्य अकादमीचा विष्णुदास भावे पुरस्कार

22 Mar 2023 13:45:56
 
arun shekhar
 
मुंबई : 'आ से आम पर चर्चा' या हिंदी भाषेतील लेखक व रंगकर्मी अरुण शेखर यांना साहित्य अकादमीचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ मार्च रोजी हा पुरस्कार अरुण शेखर यांना रंग शरद ऑडिटोरियम येथे प्रदान करण्यात येईल. हे पुस्तक म्हणजे एक नाट्यलेखन आहे. या नाटकातून समज आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची विसंगती अधोरेखित केली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या पुस्तकाचे लिखाण व मुखपृष्ठ सुद्धा अरुण शेखर यांनीच केले आहे.
 
अरुण शेखर यांनी लिहिलेले हे दुसरेच पुस्तक. याआधी त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. 'मेरा ओर न छोर' असे या काव्यसंग्रहाचे नाव होते. त्याच्या प्रकाशनानंतर अरुण यांनी नाट्यलेखनाकडे आपला मोर्चा वळवला. व तीन नाटके असलेले एक पुस्तक म्हणजेच 'आ से आम पर चर्चा' हे लिहिले.
 
 
Powered By Sangraha 9.0