मोमीनने औरंगजेबाचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, झाली अटक
सावर्डे गाव बंद, तीव्र पडसाद
20-Mar-2023
Total Views |
कोल्हापूर : एका कट्टरपंथी तरुणाला आपल्या व्हॉट्सअपवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. वडगाव पोलीसांनी तक्रारीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हातकणंगले येथे रहाणाऱ्या मोहम्मद मोमीन या कट्टरपंथी तरुणाने गुरुवार दि. १६ मार्च रोजी औरंगजेबाचा स्टेटस व्हॉट्सअपवर ठेवला होता. या प्रकारामुळे सोशल मीडियावर याचे तीव्र पडसाद उमटले. शिवप्रतिष्ठानसह काही शिवप्रेमी संघटनांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला.
सावर्डे ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध म्हणून गाव बंद ठेवले होते. या कुटूंबाला गावातून हद्दपार करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. या संदर्भात संरपंच अमोल कांबळे यांनी तसे करण्यास नकार दिला. याविरोधात कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. त्यानी ग्रामपंचायत कार्यालयालाही टाळे ठोकले. गावात मोर्चा काढून घडल्या प्रकाराचा निषेध म्हणून गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
गावकऱ्यांनीही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने संबंधित तरुणाविरोधात कारवाई न केल्यास रविवारपासून साखळी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. अखेर पोलीसांनी कारवाई करत मोमीनवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे या आरोपा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी या संदर्भात शांतता राखण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले आहे.
सोशल मीडियावर मोमीनचे समर्थन!
या प्रकरणी सोशल मीडियावर मोमीनच्या समर्थनार्थ शेकडो कट्टरपंथींनी आपला पाठींबा दर्शविला आहे. "'होता है तो होने दो हमारे कत्ल का सौदा.. हमे भी तो पता चले बाज़ार में क्या है हमारी कीमत ||' ", असे म्हणत नातिक हकी या ट्विटर युझरने त्याचे समर्थन केले आहे. औरंगजेबाचे स्टेटस ठेवले तर गुन्हा काय?, अशा आशयाचा मजकूर त्याने ट्विट केला आहे. सध्या मोमीन पोलीसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
गोदामाला आग
सावर्डेतील सद्दाम मोमीन यांचे साखरेच्या पोत्याचे गोदाम आहे. मिणाचे रोडवर असलेल्या या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास तीन अज्ञातांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आठ लाख किमतीचा मुद्देमाल खाक झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे.