बॉटनीच्या विद्यार्थ्यांना मशरूम मशागतीचे धडे

13 Mar 2023 13:31:58



mushrooms




मुंबई (प्रतिनिधी):
मुंबई जवळील विरार येथील विवा कॉलेजने बॉटनी म्हणजेच वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अनुभव घेता यावा म्हणून मशरूम्सचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. मशरूम्स उगवण्याचा आणि हाताळण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी ‘मशरूम मशागत कार्यशाळा’ एक आणि दोन फेब्रुवारीला घेण्यात आली.

या कार्यशाळेत ४० विद्यार्थी समाविष्ट होते. कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ दीपाली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मशरूम उगवण्याचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनावर आधारित विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती करत महाविद्यालयातील एका हॉलमध्ये ऑईस्टर मशरूम उगवण्याची मोहीम हाती घेतली. एका विशिष्ट पद्धतीने मशरूमच्या उत्पनाची प्रक्रिया केल्यानंतर मशरूम तयार केले आहेत. या कार्यशाळेच्या चांगल्या प्रतिसादामुळे कार्यशाळेसाठी दुसरी कार्यशाळा ही आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील मशरूम्स अद्याप उष्मायनात (इनक्यूबेशन) ठेवलेली असून त्यांची प्रक्रिया पूर्ण हिने बाकी आहे.



mushroom workshop

मशरूम म्हणजे काय ?
मशरूम्स म्हणजेच अळंबी ही फंगी म्हणजेच बुरशी गटातील आहे. मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसात अधिक आढळणारा हा बुरशी प्रकार आहे. बुरशीमधील मशरूम्सच्या अनेक प्रकारांपैकी काहीच खाण्यायोग्य असतात. त्यात ऑईस्टर मशरूम्सचा ही समावेश होतो.





मशरूम कसे वाढवतात ?
खाण्यायोग्य मशरूमची अनेक ठिकाणांहून मागणी असते. ते सगळीकडेच नैसर्गिकरित्या वाढू शकत नाही. महाराष्ट्र आणि अन्य काही भागांमध्ये मशरूमची शेती केली जाते. हे मशरूम विशिष्ट प्रक्रिया करून इनक्यूबेट केले जातात. तुम्ही वाढवत असलेल्या मशरूमच्या प्रजातींवर इनक्युबेशनची वेळ अवलंबून असते. विशिष्ट पिशवीत एका ठराविक तापमानात ही पिशवी टांगून ठेवली जाते. प्रजातींच्या वैविध्यानुसार ही इनक्यूबेशनची प्रक्रिया दोन ते तीन आठवडे घेते.




mushroom cultivation
Powered By Sangraha 9.0