मुंबई : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले आहे. परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला होता. मुशर्रफ हे काही काळापासुन आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना अमायलोइडोसिस हा आजार होता. त्यामुळे त्यांचे सर्व अवयव निकामी झाले आहेत.
१९४७ मध्ये त्यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान ला जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते. मुशर्रफ यांचे वडील सय्यद मुशर्रफ मुत्सदी होते. परवेझ मुशर्रफ 1949 ते 1956 टर्कीत होते आणि त्यानंतर त्यांनी पाकिस्तान लष्कराचा भाग झाले.देशद्रोहाच्या आरोपात लाहोर हायकोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. गेल्या वर्षी त्यांच्या मृत्यूबद्दल अफवा पसरली होती.
2007 ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुर्शरफ यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक जिंकली. मात्र त्यांच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी घोषित केली. मुख्य न्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांच्या जागी नव्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली. नव्या मुख्य न्यायाधीशांनी मुशर्रफ यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केलं. ऑगस्ट 2008मध्ये मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दोन मुख्य सत्ताधारी पक्षांनी त्यांच्याविरोधात महाभियोगाचे आरोप निश्चित केल्यानंतर सहमतीने मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं.
1999 मध्ये सत्तांतर होऊन ते पाकिस्तानचे प्रमुख झाले. अनेकपक्षीय राजकीय व्यवस्था आणि संविधानाला त्यांनी बरखास्त केलं. 2002मध्ये ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. ऑक्टोबर 2017मध्ये त्यांची पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. ते सत्तेतून बाजूला झाल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. 2008 मध्ये त्यांनी पाकिस्तान सोडलं आणि लंडनला रवाना झाले. २०१३ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी ते पाकिस्तानात परतले. पण निवडणुक लढवण्यासाटी त्यांना अपात्र ठरनण्यात आले होते. २०१७ मध्ये त्यांना फरार घोषित करण्यात आलं.