मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना आज शनिवार दि. ४फेब्रुवारी सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान ७ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. दरम्यान, मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणाचा अर्थसंकल्पामध्ये (BMC Budget 2023) विशेष तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्पासाठी विशेष तरतूद :
- शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार
04 February, 2023 | 12:47
04 February, 2023 | 12:48
मुंबई महापालिका सामाजिक प्रभाव उपक्रम.
महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी भरीव तरतूद.
- महिला बचतगट - 11.65 कोटी
- महिला अर्थ सहाय्य योजना - 100 कोटी
- दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी
- तृतीय पंथीयांसाठी पहिल्यांदाच अर्थ सहाय्य 2 कोटी
- ज्येष्ठ नागरिक - 11 कोटी
- महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी
पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी 1376 कोटी. गेल्यावर्षी 887.88 कोटी
- आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया केंद्र. यात कुलाबा येथे मलनिस्सारण केंद्रातील मलजलाचे पाणी पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरित करणार प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर पाणी यासाठी 32 कोटी
- जलवाहन बोगद्याच्या कामासाठी 119.50 कोटी
- जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणिपुनरस्थापना 136 कोटी