मुंबई : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी मराठीचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित होत आहेत. मनसेनेही या दिनानिमित्त अनेक कार्यक्रम केले. ठाण्यात दि. २७ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध गीतकार कौशल इनामदार यांच्या उपस्थितीत मराठी भाषा प्रवर्तक पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि त्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माणसांना मराठी भाषा प्रवर्तक पुरस्कार दिले जातील. २७ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील सहयोग मंदिर येथे पहिल्या मजल्यावर सायंकाळी ६ वाजता हा कार्यकरनं हिवणार आहे.