समता पार्टीमुळे मशाल चिन्ह जाणार?

    24-Feb-2023
Total Views |

Uddhav Thackeray



नवी दिल्ली
: सत्तासंघर्षाचा तिढा युक्तिवादात अडकला असतानाच उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेले मशाल चिन्ह देखील गमवावे लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची चौफेर कोंडी झाली आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर गेले तीन(दिवस) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या खटल्याचा निकाल काय लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यादरम्यान आता ठाकरे गटाच्या अडचणी कमी होण्याऐवजी सातत्याने वाढताना दिसत आहेत. ‘मशाल’ चिन्ह परत मिळावे यासाठी आता समता पार्टीने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. विशेष म्हणजे, अगदी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांची समता पार्टीच्या नेत्यांनी भेट घेतली होती. ही भेट घेतल्यानंतर समता पार्टीच्या नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाला दिलेल्या चिन्हाबद्दल याचिका दाखल करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अभिषेक मनु सिंघवींना सुनावले. 


उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावरून न्यायालयाने अभिषेक मनु सिंघवींना सुनावले. “जर तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असता, ज्यात खुल्या पद्धतीने मतदान होते आणि हरला असता, तर त्या ३९ आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला ते स्पष्ट होऊ शकले असते. जर फक्त त्या ३९ आमदारांमुळे तुम्ही विश्वासदर्शक ठराव हरला असता, तर ते अपात्र ठरल्यानंतर तुम्ही तो ठराव जिंकला असता,” असे न्यायालयाने यावेळी म्हटले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.