उल्हासनगर शहरात विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी

24 Feb 2023 18:35:31
 
MP Dr. Shrikant Shinde
 
ठाणे - महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचानिधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह, समाजमंदिर उभारणे , नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनीराज्यशासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाकडून उल्हासनगर महापालिकेला हा निधी मंजूर करण्यात आलाआहे. या मूलभूत विकासकामांमुळे उल्हासनगरमधील नागरिकांना दिलासा मिळणार असून शहरांच्या सौन्दर्यात भर पडणार आहे.
 
 
 
कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी निधी मिळविण्याबात खासदार डॉ. श्रीकांत शिंदें यांच्याकडून राज्यतसेच केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. गेल्या काही महिन्यात खासदार डॉ. शिंदे यांनी पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांसह रस्ते प्रकल्पांनाही प्राधान्य दिले आहे. या कामांसाठी जिल्हा परिषदेच्यामाध्यमातून कोट्यावधी रूपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच अंबरनाथ शहरातील शिवमंदिर परिसरसुशोभीकरण, ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन यांसारख्या योजना राबविण्यात येत आहे. यातीलबहुतांश कामे प्रगतीपथावर आहे.
 
 
 
या कामांबरोबरच आता उल्हासनगरमध्येही विविध विकासकामांना गती मिळणार आहे. राज्यशासनाच्या नगरविकास विभागातर्फे उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर शहरातील अनेक कामे प्रगतीपथावर येणार असूननागरिकांना काँक्रीटचे रस्ते, बगीचे, महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
 
या विकास कामांसाठी निधी मंजूर
 
नव्याने उपलब्ध झालेल्या निधीतून उल्हासनगर शहरात सार्वजनिक शौचालय उभारणे, महिलासांठी स्वतंत्र शौचालय, नाल्यांचीउभारणी करणे, गटार बांधणे, संरक्षण भिंत उभारणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, नवीन रस्ते उभारणी, फुटपाथ तयार करणे, समाजमंदिर तयार करणे, अभ्यासिका, बगीचा उभारणे, आरोग्य केंद्र, जॉगिंग ट्रॅक, बाकडे बसविणे, विद्युत दिवे बसविणे, पत्र्यांचे शेड उभारणे, कल्व्हर्ट दुरुस्ती करणे, पायवाट, ड्रेनेजचे काम, सुशोभीकरण, बुध्दविहार उभारणे, पाईपलाईन टाकणे, सभामंडप उभारणे, कुंपणउभारणे, साकव बांधणे, सुविधा आणि साधनसामग्री युक्त व्यायामशाळा उभारणे, शहरांतील दिशा दर्शक फलक उभारणे, जुन्या दिशादर्शकांचे सुशोभीकरण करणे यांसारखी कामे होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0