इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात !

24 Feb 2023 17:47:17
 
Cyber crime
 
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत तरुणीला गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून तिच्या वडिलांच्या खात्यातील सुमारे ९९ हजार ९९९ रुपयांवर डल्ला ,मारला असून दहिसर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत सुमारे ९६ हजार रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
दरम्यान या तरुणीची इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली आणि त्यांनतर तरुणाने गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. परंतु हे गिफ्ट न पोहोचल्यामुळे या तरुणीने गुगलच्या माध्यमातून ट्रॅक ऑन सर्विस या कंपनीच्या 92636230 या नंबरवर संपर्क साधला. मात्र कुरियर संबंधित माहितीसाठी तरुणीला तीन रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि याच वेळी तरुणीच्या वडिलांच्या खात्याची सर्व माहिती फ्रॉडकडे गेल्यामुळे खात्यातील ९९ हजार ९९० रुपये अचानक खात्यातून गेले. त्यानंतर वडिलांसह जात या तरुणीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलिसांकडून सायबर सेफ पोर्टलच्या माध्यमातून ट्रान्सफर झालेले पैसे आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आरबीएल बँकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तक्रारदारास ९६ हजार रुपये पुन्हा मिळवून देण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0