बिहारच्या राजकारणात जुना भिडू नव्या नावाने सज्ज

- उपेंद्र कुशवाह यांनी स्थापन केला ‘राष्ट्रीय लोक जनता दल’ पक्ष

    20-Feb-2023
Total Views |
 
Upendra Kushwaha
 
नवी दिल्ली : बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह हे जुना भिडू ‘राष्ट्रीय लोक जनता दल’ या नव्या नावाने राजकारणात सज्ज झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासमोरील अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
 
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांच्या कार्यशैलीवर टिका करून उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी पक्ष सोडण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी बिहारच्या राजकारणामध्ये आता राष्ट्रीय लोक जनता दल या नव्या पक्षाचीही स्थापना केली आहे. यावेळी उपेंद्र कुशवाह म्हणाले, नितिश कुमार यांचे राजकारण आता पूर्णपणे भरकटले आहे. त्यांनी प्रारंभी अतिशय सकारात्मक राजकारण केले, मात्र आता त्यांचे राजकारण बिहारसाठी चांगले राहिलेले नाही. ते सध्या केवळ २ ते ३ लोकांच्या सल्ल्यानुसार काम करत असून स्वतःच्या मनाने निर्णय घेणे त्यांनी बंद केले आहे. त्यांनी पक्षाच्या संघटनेकडे दुर्लक्ष केले, उत्तराधिकारी निवडले नाही. त्यामुळेच भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना आता पक्षाबाहेरच्या लोकांची मदत घ्यावी लागत अशल्याचा टोला कुशवाह यांनी लगाविला आहे.
 
दरम्यान, उपेंद्र कुशवाह यांना पक्षात घेण्यासाठी नितीश कुमार यांनीच आग्रह धरला होता. मात्र, त्यानंतर कुशवाह यांनी पक्षविरोधी कारवायांना प्रारंभ केल्याचे जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी म्हटले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.