मुंबई : येत्या काळात ‘लव्ह जिहाद’ टाळणे काळाची गरज असल्याचा इशारा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात प्रखर मत मांडणार्या योगिता साळवी यांनी दिला आहे. जनकल्याण समिती वस्ती परिवर्तन योजनेंतर्गत कार्य करणार्या कार्यकर्त्यांशी त्यांनी रविवार, दि. 12 फेबुवारी रोजी ‘लव्ह जिहाद समजून घेताना’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘लव्ह जिहाद’च्या घटना भविष्यात घडू नये, यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे अभ्यासपूर्ण आणि परखड मत योगिता साळवी यांनी यावेळी मांडले.
जनकल्याण समितीचे सहदेव सोनावणे तसेच संजय माळकर यांच्यासह जनकल्याण समितीचे पदाधिकारी आणि वस्ती परिवर्तन कार्य करणार्या शेकडो महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. वस्ती परिवर्तन योजनेत कार्य करणार्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमांतर्गत खेळ, स्नेहभोजन, मनोरंजानसोबतच जागृतीपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानांतर्गत या सहलीमध्ये ‘लव्ह जिहाद’विषयक जनजागरण करण्यात आले. यावेळी सहदेव सोनावणे, संजय माळकर यांनी वस्ती परिवर्तनासाठीची गरज विशद केली.