मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राजस्थानमधून जाणारा नवी दिल्ली ते मुंबई द्रुतगती महामार्गाचे काम सुरू आहे. राजस्थानातील रणथंबोरच्या वन्यजीव अभयारण्यातुन हा महामार्ग जात असल्याने येथील वाईल्डलाईफ मिटीगेशन मेजर्स म्हणजेच वन्यजीव संरक्षण उपायांचे पालन करणे गरजेचे आहे. वन्यजीव अभयारण्यावरील प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे संरेखन करण्यात आले आहे.
भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा हा देशातील सर्वांत लांब असणारा महामार्ग १,३५० किलोमिटर लांबीचा असणार आहे. या महामार्गासाठी ९०,००० कोटींचा खर्च करण्यात येईल. भारतातील हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतुन हा महामार्ग जाणार आहे. तसेच, या महामार्गाची खासियत म्हणजे वन्यजीवांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी राजस्थानातील मुकुंद्रा अभयारण्य आणि माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये भारतातील पहिले ८ लेन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. वन्यजीव विभागातील प्राण्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी ३ फूट उंचीची सीमा भिंत आणि समर्पित ध्वनी अडथळे ही उभारण्यात येणार आहेत. वन्यजीव संरक्षण उपायांर्गत वन्यजीवांच्या अनिर्बंध हालचाली सुलभ करण्यासाठी वैशिष्ट्यीकृत केलेले ३ अंडरपास आणि ५ ओव्हरपास असे एकुण ८ बोगदे तयार करण्यात येतील.
नवी दिल्ली ते मुंबई हा महामार्ग भारतातील पहिला सर्वांत जास्त लांबीचा तर आशिया खंडातील दुसरा सर्वांत जास्त लांबीचा महामार्ग आहे. वन्यजीव अभयारण्याला आणि जैवविविधतेला कमित कमी धक्का पोहचावा म्हणुन वन्यजीव संरक्षण उपाययोजनांचे पालन केले जात नाही.