मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले.
आणखी महत्त्वाच्या घोषणा :
- देशात ५० विमानतळं उभारण्यात येणार.
- गरिबांच्या घरांसाठी ७९ हजार कोटींचा फंड.
- मोफत अन्नधान्य वाटप योजना ८० कोटी लोकांना लाभ, २ लाख कोटींचा खर्च.
- ४४ कोटी ६० लाख नागरिकांना जीवन विम्याचं कवच.