कर्नाटकासह, महाराष्ट्रात NIA ची ४४ ठिकाणी छापेमारी!

09 Dec 2023 11:44:50
 
NIA raids
 
 
मुंबई : कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक, भाईंदर असे ४४ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने मोठी कारवाई केली आहे. सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे. 
 
कर्नाटक १, पुण्यात २, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर ९, भाईंदर १ अशा ठिकाणी इसिस ही दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे समजले होते. बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचणसह बोरिवली पडघा परिसरातून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या कडून इसिस संबंधी काही सामान जप्त करण्यात आलं आहे.
 
 
 
भिवंडीतील पडघा आणि बोरिवली गाव या ठिकाणी सर्वाधिक छापे टाकण्यात आले आहे. इसिस या संघटनेचा राज्यातील मुख्य पाया पडघ्यात रोवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी पडघ्यातुन एनआयए ने साकीब नाचन चा मुलगा शमील नाचन, नातेवाईक अकिल नाचन सह काही जणांना पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील दोन ठिकाणी आणि कल्याण येथून एक ठिकाणी छापे टाकून येथून २जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
दरम्यान, गेल्या महिन्यात देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणे इसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला मोहम्मद शाहनवाज आलम दहशतवाद्याला एनआयएने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0