एमपीएससी अंतर्गत नवी भरती जाहीर, ‘या’ पदाकरिता नोकरीची सुवर्णसंधी!

09 Dec 2023 17:46:37
Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससी अंतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवामधील भरतीविषयक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

AIASL Recruitment 2023 : १० वी पास ते पदवीधरांनो विविध पदांकरिता भरती सुरू; कसा कराल अर्ज जाणून घ्या

एमपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब या पदाकरिता दि. १२ डिसेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरूवात होणार असून अंतिम मुदत दि. ०१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच, या भरतीकरिता अर्जदारास शुल्क भरावे लागेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांस ७१९ रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता ४४९ रुपये अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0