IREL अंतर्गत काम करण्याची पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर माहिती

09 Dec 2023 18:55:51
IREL India Recruitment 2023

मुंबई :
आयआरईएल (इंडिया) लिमिटेडकडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयआरईएल अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. IREL (इंडिया) लिमिटेडमधील एकूण ०९ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. भरतीविषयक अधिक तपशील अधिकृत वेबसाईटवर पाहा. 


जरुर वाचा >> एमपीएससी अंतर्गत नवी भरती जाहीर, ‘या’ पदाकरिता नोकरीची सुवर्णसंधी!


आयआरईएल (इंडिया) लिमिटेड अंतर्गत मुख्य व्यवस्थापक (वित्त), वरीष्ठ व्यवस्थापक (वित्त), उप व्यवस्थापक (वित्त), सहाय्यक व्यवस्थापक (वित्त), उप व्यवस्थापक (तांत्रिक), सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक), तांत्रिक पर्यवेक्षक, वरीष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी दि. २४ नोव्हेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरूवात झाली असून अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२३ असणार आहे.
Powered By Sangraha 9.0