भोपाल : मध्य प्रदेशातील निवडणुकीपूर्वी रतलाममधील काँग्रेस उमेदवार पारस सकलेचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलेल्या मुस्लिम फकीराच्या चप्पलेचा मार खाऊनही ६० हजार मतांनी पराभूत झाले आहेत. अलीकडेच, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला एका मुस्लिम फकीराकडून चप्पलचे मार आशीर्वाद म्हणून घेत होता. पारस हा तोच काँग्रेस नेता आहे.ज्याने २०१९ मध्ये साध्वी प्रज्ञा यांना 'डायन' म्हटले होते.
पारस सकलेचा रतलाम अर्बन मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांचा भाजपच्या चेतन कश्यप 'भैयाजी'कडून पराभव झाला. चेतन कश्यप यांना १,०९,६५६ लाख तर सकलेचा यांना ४८,९४८ मते मिळाली आहेत. त्यांचा ६०,७०८ मतांनी पराभव झाला. सकलेचा यांच्या निवडणूक निकालावर मुस्लिम फकीराच्या चप्पलचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारे म्हातारी व्यक्ति पारस सकले यांच्या कधी पाठीवर, कधी खांद्यावर तर कधी चेहऱ्यावर चापट मारतो. आणि एकदा मारल्यावर ते थांबत देखील नाहीत. दरम्यान मागून कोणीतरी म्हणतो, बाबा, पुरे झाले, पण म्हातारी व्यक्ति काही केल्या थांबत नाही. यावेळी काँग्रेस नेते हसत हसत त्यांच्या पायाला स्पर्श करत राहतात.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी काँग्रेस नेत्याची खिल्ली उडवली होती. कोणी चप्पल घालण्याच्या लायकीची कॉंग्रेसच आहे,असे म्हणत तर कोणी बाबांनी आशीर्वाद देण्यात कोणतीही कसर सोडली नाही असे चिमटे काढत होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्याला चापट लगावणारी व्यक्ति कमल रझा नावाचा फकीर आहे. तो महू नीमच रोडवर फिरतो आणि त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना चप्पल मारून आशीर्वाद देतो. बरेच लोक त्यांच्या तक्रारींसह नवीन चप्पल आणतात जेणेकरून कमल रझा त्यांना मारहाण करून आशीर्वाद देऊ शकतील.