सिंधुदुर्ग : भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मालवणात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ४ हजार पोलीस, ४०० पोलीस अधिकाऱ्यांसह ५०० होमगार्ड तैनात आहेत.
याच पार्श्वभुमीवर मालवण, तारकर्ली बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.