नौदलाच्या युद्धनौकेला 'मालवण' असे नाव!

04 Dec 2023 16:03:57
 
INS Malvan
 
 
मालवण : नौदलाच्या ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मालवण या युद्धनौकेचे जलावतरण झाले आहे. ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका असेल.
 
भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होत आहे. मालवण ही पाणबुडीविरोधी लढा देणारी युद्धनौका आहे. युद्धनौकेला मालवण नाव दिल्याने मालवणचे आरमाराच्या दृष्टीने असलेले महत्त्व राष्ट्रीयस्तरावर अधारेखित झाले आहे.
 
 
 
नौदलाच्या ताफ्यात सध्या असलेल्या फ्रिगेट्स, विनाशिका या युद्धनौका पाणबुडीचा सामना करण्यास सक्षम आहेत. त्यासाठी पाणबुडीविरोधी पाणतीर डागण्याची त्यांची क्षमता आहे. मात्र, मोठ्या युद्धनौका या प्रकारचा लढा सहसा खोल समुद्रात देतात. किनाऱ्याजवळ किंवा प्रत्यक्ष खोल पाण्याआधी उथळ पाण्यात (जवळपास १२ सागरी मैल अंतरापर्यंत) अशाप्रकारे पाणबुडीविरोधी लढा देण्यासाठी विशेष युद्धनौकांची नौदलाला गरज होती.
 
नौदलामध्ये युद्धनौकांचे जलावतरण हे महिलांच्या हस्ते होते. त्यानुसार ‘मालवण’चे जलावतरण दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते झाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0