लखनौ : अयोध्येतील राम मंदीराचे २२ जानेवारीला उद्धाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत रामललांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललला ज्या पाण्याने अभिषेक केला जाईल ते पाणी नेपाळच्या पवित्र नद्यांमधून आणण्यात आले आहे.
नेपाळी भाविकांनी जनकपूरहून पाणी आणून राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सोपवले आहे. रामललाच्या अभिषेकासाठी वापरले जाणारे १६ पवित्र नद्यांच्या पाण्याचा कलश नेपाळहून आलेल्या भाविकांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला. त्याबद्दल चंपत राय यांनी त्या भक्तांचे आभार मानले आहेत. हे पाणी पवित्र यज्ञयागात ठेवण्यात आले आहे.
राममंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अयोध्येत जोरदार तायारी सुरु आहे. भारतभर त्यासाठी उत्साहाच वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातू रामभक्त आपापल्या परी सोहळ्यासाठी विविध वस्तू पाठवत आहेत. नेपाळनेही याआधी मूर्ती बनवण्यासाठी दगड, स्मृतीचिन्हे अशा अनेक वस्तु पाठवल्या आहेत.