मुंबई : दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते आणि तामिळनाडूमधील राजकीय व्यक्तीमत्व कॅप्टन विजयकांत यांचे आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी चेन्नईत निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विजयकांत यांना करोना झाला होता. त्यावरील उपचारांसाठी ते गेले काही दिवस चेन्नईमधील MIOT रुग्णालयात दाखल झाले होते.
विजयकांत यांच्या निधनामुळे सिनेविश्वातून आणि राजकीय व्यक्तींकडून देखील शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठे व्यक्तीमत्व असलेल्या विजयकांत यांना श्रद्धांजली असे पंतप्रधानांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, विजयकांत यांनी ओळख 'कॅप्टन' अशी होती. विजयकांत यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांत काम केले होते. मनोरंजनासोबतच राजकारणात देखील ते सक्रिय होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक आमुलाग्र बदल घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.