काशीतील मुस्लिम कुटुंबांनी दिली राम मंदिरासाठी देणगी!

27 Dec 2023 18:19:11
 muslim donation ram mandir 
 
लखनौ : काशी प्रांतातील साधारण २२ कुटुंबांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. यापैकीच एका परिवारातील इकरा अन्वर खान या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी ११,००० रुपयांची देणगी दिली होती. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी एबीपी न्युज या वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहीती दिली. इकरा अन्वर खानने आपल्या हातावर जय श्री रामही लिहले आहे.
 
 
 
"२०२१ मध्ये अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी, सर्व वर्गातील लोकांना या ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन वारशाशी कायमचे जोडण्याच्या उद्देशाने सामूहिक समर्पण निधीचे काम केले जात होते आणि आजपर्यंत देशभरातून हजारो लोकांनी यात योगदान दिले. ज्यामध्ये विविध धर्माच्या लोकांचाही समावेश आहे". असे स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी म्हटल आहे.
 
श्रीराम मंदीराच्या उद्घाटनासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराममंदीर उभारण्यासाठीचा निधीही जनतेतुनच जमा करण्यात आला होता. आताही सर्वजण उत्साहाने आपापल्यापरीने राम मंदिरासाठी काहीना काही करत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व २५ जानेवारीपासुन मंदीर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधांन नरेंद्र मोदी उपस्थीत राहणार आहेत. त्याचबरोबर देशभरातुन अनेक मान्यवर ही उपस्थीत राहणार आहेत. 
 
 
Powered By Sangraha 9.0