मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण!

24 Dec 2023 16:57:31

Dhananjay Munde


पुणे :
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते पुण्यातील घरी क्वारंटाईन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. यात त्यांची टेस्ट पॉसिटिव्ह आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी ते सध्या क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जेएन १ हा कोरोनाचा नवीन विषाणू पसरत आहे. या आजाराचे काही रुग्णदेखील आढळले आहेत. मात्र, नागरिकांना घाबरुन न जाता कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.


 
Powered By Sangraha 9.0