नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी विधानसभेत आपल्या भाषणात सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या उज्जैन दौऱ्यावर असताना बाबरच्या हल्ल्यापूर्वी अयोध्येचे राम मंदिर सम्राट विक्रमादित्यने बांधले होते, असे उद्धृत केले होते. हे मंदिर दोन हजार वर्षांपूर्वी बांधले गेले. तसेच यादव म्हणाले की, राम हे फक्त नाव असले तरी त्यांची लीला सर्वत्र आहे. राम नामात, राम घोषात, आराम, विश्रांम अशा सर्व गोष्टी श्रीरामांनी व्यापून टाकलेल्या आहेत.
देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. सम्राट विक्रमादित्यचा इतिहास देशालाच नव्हे तर जगाला कळला पाहिजे, असे ते म्हणाले. जर आपण अयोध्येबद्दल बोललो तर त्याचा सम्राट विक्रमादित्य आणि उज्जैनशीही संबंध आहे. सीएम मोहन यादव म्हणाले की, योगी आदित्यनाथ गेल्या वर्षी उज्जैनला आले होते तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता की, सम्राट विक्रमादित्य यांनी २००० वर्षांपूर्वी राम मंदिर बांधले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानाची पुष्टी देत यादव म्हणाले की, बाबरच्या हल्ल्यापूर्वीच्या मंदिराचे स्वरूप सम्राट विक्रमादित्यने बांधले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. दोन भावांच्या तीन जोड्या जगात खूप प्रसिद्ध असल्याचेही डॉ.मोहन यादव यांनी नमूद केले. यामध्ये कृष्ण-बलराम, राम-लक्ष्मण आणि सम्राट विक्रमादित्य आणि त्याचा भाऊ भत्रीहरी यांचा समावेश आहे. त्यांनी भरतहरीने लिहिलेल्या तीन प्रसिद्ध धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला.
तसेच डॉ.मोहन यादव यांनी सम्राट विक्रमादित्य यांच्यासंदर्भात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. उज्जैनमध्ये त्यांनी विक्रम उत्सवाचे उद्घाटन केले. याशिवाय सम्राट विक्रमादित्य यांच्या जीवनावर आधारित नाटकही उज्जैनमध्ये सादरीकरण करण्यात आले. ऐतिहासिकदृष्ट्या, सम्राट विक्रमादित्य त्याच्या न्याय प्रेमासाठी तसेच शौर्यासाठी ओळखला जातो.