फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणावर बार्टी संस्थेचे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन!

19 Dec 2023 11:42:40
barty book exhibition
 
पुणे : बार्टी संस्थेमार्फत "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ; इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन" या शोध प्रबंधसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" यांनी प्रदान केलेल्या "डॉक्टर ऑफ सायन्स" या पदवीच्या शतकपूर्ती निमित्त श्री सुनील वारे, महासंचालक बार्टी यांचे मार्गदर्शनाने बार्टी संस्थेतर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 

babasaheb ambedkar books 
 
राष्ट्रीय पुस्तक ज्ञान या भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य पुस्तक महोत्सवाचे दिनांक १६ ते २४ डिसेंबर २०२३ या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संस्थेमार्फत "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन " या शोध प्रबंधासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना "लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" यांनी प्रदान केलेल्या "डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc) या पदवीच्या शतकपूर्ती निमित्त पुस्तक प्रदर्शनात बार्टी संस्थेमार्फत संविधान व महापुरुषांची विविध ग्रंथ, पुस्तके ८५ % सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याबाबत व बार्टी संस्थेच्या विविध योजनांची माहिती देणेत येत आहे. या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.अशा या भव्य- दिव्य व उत्साहात सुरू असलेले प्रदर्शन श्री.सुनील वारे महासंचालक, बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनात नियोजित करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0