मुंबई : मिलिया माध्यमिक विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाचा एमएमएस व्हिडीओ समोर आला आहे. असे एक-दोन नाही तर अनेक व्हिडीओ आहेत. याचे नाव आमेर काझी असून तो वेगवेगळ्या एमएमएसमध्ये तीन सहकारी शिक्षिकांसोबत दिसत आहे. या महिला त्याच शाळांमध्ये शिकवणाऱ्या महिला शिक्षिका आहेत. हे एमएमएस व्हायरल करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमेर काझीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमेर काझी फरार आहे.
शाळा प्रशासनाने 3 महिला शिक्षकांनाही निलंबित केले आहे. आमेर काझीच्या पत्नीनेही पतीवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला आहे. आमेर काझीच्या पत्नीचा आरोप आहे की, 2012 पासून आपल्या पतीच्या हालचालींवर तिला संशय होता. आमेर काझीने आपल्या पत्नीची दिशाभूल केली पण नंतर त्याने आपल्या चुकीची कबुली दिली. एके दिवशी पतीने अनेक मुलींसोबत अवैध संबंध असल्याचे सांगितले. आमेरच्या लॅपटॉपमधून त्याच्या पत्नीने आपल्या पेनड्राईव्हमध्ये अनेक महिलांसोबतचे आपल्या पतीचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडिओ सेव्ह केले होते.