पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला! स्फोटकांनी भरलेला ट्रक सुरक्षा चौकीत घुसवला

13 Dec 2023 14:30:15
 
Pakistan
 
 
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील दाराबा परिसरात स्फोटकांनी भरलेली कार आर्मी बेसच्या इमारतीला धडकवली. या हल्ल्यात 24 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 34 सैनिक जखमी झाले आहेत.
 

Pakistan 
 
डेरा इस्माइल खान जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत आहे. हा जिल्हा खैबर पख्तून्ख्वां जवळ असून तेहरीक-ए-तालिबान (टीटीपी) चा गड मानला जातो. दहशतवाद्यांनी एक स्थानिक पोलिस ठाणे व आर्मी बेसला निशाणा बनवले आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला य़श आले आहे.
 

Pakistan 
 
दहशतवाद्यांनी प्रथम स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिस स्टेशनच्या इमारतीत घुसवली. त्यानंतर हल्ला करत ब्लास्ट घडवून आणला. या हल्ल्यात सर्व हल्लेखोर दहशतावादी मारले गेले आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर सर्वत्र शोधमोहीम सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. हल्ल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांसाठी 'इमर्जन्सी' घोषित करण्यात आली आहे. तर सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0