कोकण रेल्वेत काम करण्याची संधी; जाणून घ्या कसा कराल अर्ज

01 Dec 2023 15:54:39
Kokan Railway Corporation Limited Recruitment 2023
 
मुंबई : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली असून कोकण रेल्वेकडून यांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, कोकण रेल्वेतील एकूण १९० रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
 
कोकण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून अॅप्रेंटिसशीपसाठी तरुणांना चांगली संधी मिळत असून पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस या जागांकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अंतिम मुदत दि. १२ डिसेंबर २०२३ असणार आहे.

वाचा सविस्तर >> 'महापारेषण'अंतर्गत मेगाभरती सुरू; अर्ज करण्याकरिता जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत
 
या भरतीकरिता उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून पदवीधर अप्रेंटिस संबंधित विषयात इंजिनीअरिंग तर जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी तसेच, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस या पदाकरिता संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे.

अर्जदारासाठी अर्जशुल्क आकारण्यात येणार असून प्रवर्गानुसार शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जशुल्क माफ करण्यात आले आहे. कोकण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या अॅप्रेंटिस भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0