ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरी उजळल्या ज्योती! दिवाळीनिमित्त हिंदूंचे केले भव्य स्वागत

09 Nov 2023 19:00:38

Rishi Sunak


मुंबई :
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी केली आहे. डाउनिंग स्ट्रीट येथील शासकीय निवासस्थानी त्यांनी हिंदू समाजातील लोकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
 

पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ९ नोव्हेंबर रोजी आपल्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फोटोमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती दिवे लावताना दिसत आहेत. यावेळी त्याच्या आजूबाजूला अनेक लोक दिसत आहेत.
 
या पोस्टमध्ये त्यांनी अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव असे लिहिले आहे. तसेच ब्रिटन आणि जगाभरातील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, अनेक भारतीयांनी त्यांच्या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे, काही कट्टरपंथीयांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.



Powered By Sangraha 9.0